Wednesday 15 April 2020

इतिहास

ज्या दैदिप्यमान इतिहासाचे आपण गोडवे गातो त्या इतिहासात असं बऱ्याचदा घडलं आहे की  दोन राजे एकमेकांचे शत्रू असायचे, पण बाहेरचा कुणी दुश्मन आला तर मात्र दोन राजे एकत्र यायचे आणि त्या बाहेरच्या दुष्मनाचा खात्मा करायचे.

तो दुश्मन परत गेला की हे दोन राजे परत एकमेकांवर तलवारी चालवायला तयार व्हायचे.

इतिहासातून या गोष्टी शिकायच्या असतात. नाहीतर आम्ही फक्त, जगाला शून्य दिला, आमच्याकडे पुष्पक विमान होतं असल्या बाता मारण्यात मश्गुल राहतो आणि बाहेरचा अगदी भयानक स्वरूपाचा शत्रू राज्यात येऊन धुमाकूळ घालतोय तरी दोन्ही राजे दररोज रात्री तलवारीला धार लावत असतात अन दुसऱ्या दिवशी वाग्बाण सोडून एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करतात. या प्रोसेस मध्ये शत्रू आपले अक्राळविक्राळ हातपाय पसरतोय हे या राज्यांच्या ध्यानात पण येत नाही आहे.

राजेहो, तुम्हाला इतिहास नव्याने शिकायची गरज आहे. 

No comments:

Post a Comment