तुम्हाला माहिती आहे, माझ्या कारकिर्दीला ३० sept ला २५ वर्षं पूर्ण झाली. (आम्हाला कसं माहिती असेल भैताडा. तू काय सचिन तेंडूलकर आहेस, पेपर मध्ये बातमी यायला). १ सप्टेंबर १९८९ ला या अभियंत्याने हातात Allen Key, Spanner, Screw Driver अशा आयुध्यांचा सेट घेतला (अगदी bat, racket किंवा ball च्या धर्तीवर). आणि तेव्हापासून आजतागायत त्यांनी साथ सोडलेली नाही. मध्ये मग Laptop, मोबाईल, i पॅड हि शस्त्रात्रही दिमतीला आली. ह्या अडीच दशकांच्या कारकिर्दीचे मुख्यत: तीन टप्पे पडतात. (१०००० आणि ९९९९९ दोन्ही पाच आकडी पगार. तेव्हा फक्त पाच आकडी पगार म्हणायचं. तसंच दशक, शतक हि उगाच अर्थाला वजन प्राप्त करतात.)
१९८९-१९९४: SKF India Ltd.
बजाज औरंगाबाद ने लत्ताप्रहार केल्यावर मी नोकरी शोधत भिरभिर फिरत होतो. बाबांनी शब्द टाकला आणि SKF कडून एक वर्षाची GTE Apprentice पदरात पाडून घेतली. (बाबांनी तसे शब्द कमी टाकले, पण जेव्हा टाकले, आयुष्याला वळण मिळाले इतकं नक्की). आपलं पाहिलं प्रेम (माझं ते हि शेवटचं ठरलं), पहिली नोकरी नेहमीच प्रिय असते. तशीच माझी SKF ची नोकरी. पहिल्या आठवड्यात प्रोडक्शनच्या मशीन सेटर ने मला सांगितलं "ए, जा, स्टोर मधून O ring घेऊन ये" मी विचारलं "ओरिंग च spelling काय" तर सगळ्या लोकांना बोलावून सांगितलं "बघा आजचे इंजिनियर, येड्यांना O ring म्हणजे काय ते माहित नाही". एका मशीनचं मेंटेनन्स चं काम चालू होतं, मी थोडं डोकं घालून काय चालू आहे ते पाहण्याचा प्रयत्न करत होतो, तर एक सिनीयर फिटर "ए, बाजूला हो. च्यायला एक वर्षासाठी येतात, अन डोकं पकवून टाकतात" एकदा मला एका क्वालिटी इन्स्पेक्टर ने सांगितलं " 6219 च्या १०० outer rings, groove dia साठी चेक करून ठेव" दोन एकशे ग्रामची एक रिंग, पंजात घेऊन apparatus वर फिरवायची. २०-२२ रिंगात हात दुखायला लागले. एक भला माणूस म्हणाला "तुझी फिरकी घेत आहेत, बंद कर हे काम आणि जा जेवायला". अशा भल्याबुर्या घटनांनी अडखळत सुरू झालेल्या नोकरीत मी रूळलो. अजय नाईक, मकरंद महाजन, संजीव गोयल हे इंजिनियर मित्र आणि working associates यांच्या मदतीने हा चिखलाचा गोळा चाकावर फिरू लागला. मुर्ती, विकास, सराफ, हेक्टर, सोरघडे अशी सिनीयर सुपरवायजर, पांडू भोसले, शिरसकर, राव, बी आर पाटील या सेटर मंडळींनी या गोळ्याला थापायला सुरूवात केली. मशीनवरून हात फिरायला लागला, तशी ती माझ्याशी बोलू लागली. मला हे झालं, असं कर म्हणजे production व्यवस्थित येईल असं सुचवू लागली. विश्वास बसला, मग आत्मविश्वास आला. काही सिनीयर लोकांना मी त्याचं काय चुकते ते सांगू लागलो. वाद व्हायला लागले. एकदा असाच वाद झाल्यावर एक सेटर बोलला "इथे भेटलात, वर नका भेटू" मी बोललो "कसं भेटणार, तुम्ही स्वर्गात, मी नरकात" त्याला काय बोलावं ते कळलंच नाही.
खरंतर SKF चे अनंत किस्से आहेत. सगळे लिहायचे म्हंटलं तर पाच-सहा पानं होतील. पण एक नक्की, ग्रह, तारे एकदम जोरात होते. नाहीतर जाॅब allocation च्या दिवशी टीआरबी ला जा असं सांगून, परत बोलावून, नाहीतर असं कर डीजीबीबी ला जा हे सांगणं. (TRB ला पोरं तीन महिन्यापेक्षा जास्त टिकत नसत). GTE ना सहसा एक वर्षात बाय बाय ही तिथली प्रथा. पण मी आणि संजीव गोयल GTE चे कंपनी ट्रेनी झालो. ते होताना सोमण साहेब म्हणाले, मी तुला प्लानींगला घेतो. मी तिथं टेचात बोललो "मला प्रोडक्शन मधेेच काम करायचं आहे" म्हणालो ते ठीक आहे, ते मान्य ही होणं. १८ आॅगस्ट १९९१ ला माझा साखरपुडा झाला, मी कंपनी ट्रेनी, म्हणजे confirmed जाॅब नाही. अशा वेळेस पाटील साहेबांनी बोलावून सांगायचं की "Management has decided to curtail your training period by 13 months" मी आणि तिघं १ आॅगस्ट १९९१ पासून कन्फर्म होणं. (कुणी याला वैभवीचा पायगुण ही म्हणतात). मी TQ नावाच्या लाईनवर काम करत होतो. Advanced मशीन्स, ट्रायल प्रोडक्शन पासून मी involve होतो. एकदा कंपनी हेड ग्रेस्कोव्ह (बहुधा पोलिश असावेत) लाईनवर आले आणि काहीतरी इलेक्ट्रानिक वस्तु तोंडासमोर धरून प्रश्न विचारू लागले. मला वाटलं की चांगलं काम करतोय म्हणून फोटो काढत आहेत. नंतर कळलं, माझी उत्तरं रेकाॅर्ड करून घेत होते. (९२ साली हे जरा अभिनवच). फाटलीच होती. अजय, मक्या आणि गोयलबरोबर सेकंड शिफ्टला येऊन रात्री १ वाजता केलेली प्राईडची आॅम्लेट अन बियरची (तेव्हढेच परवडलं) बॅचलर पार्टी त्यांच्या लक्षात नसेल, पण माझ्या आहे.
SKF ची गाथा एम जी चव्हाण, ए बी पाटील आणि शिदोरे साहेब यांची नावं न लिहीता पुर्ण होणं निव्वळ अशक्यच. सहा महिन्यापूर्वी MGC कंपनीत आले तेव्हा पोरांना त्यांची ओळख करून देताना मीच गदगद झालो होतो.
निव्वळ स्वप्न वेगळी बघितली म्हणून SKF चा जाॅब ३१ आॅगस्ट १९९४ ला सोडला. बारक्याच होतो, त्यामुळे सेंड आॅफ वैगेरे झाला नसावा, पण शेवटच्या दिवशी एकटाच स्कूटरवर आसवं ढाळत परत घरी आलो होतो.
आजही कुठल्या कंपनीत गेलो की SKF मधे यायचा तसा कुलंटचा वास आला की मी तो केवड्याचा सुवास घ्यावा तसा भरून घेतो आणि त्या पहिल्या नोकरी च्या प्रति कृतज्ञेतीची भावना अंगभर सरसरत जाते.
तळटीप: खूप नावं सुचत आहेत, पण जागे अभावी लिहीता येणं अवघड आहे.

No comments:
Post a Comment