नाही म्हणजे कसं आहे की इंजिनियरिंग च्या भाषेत या हृदयाच्या नळ्या तुंबण्याच्या प्रॉब्लेम ला ब्रेक डाऊन मेंटेनन्स म्हणतो. नॉर्मली असा मेंटेनन्स निघाला की एकतर पार्ट रिप्लेस करणं किंवा स्लीव्ह ग्राफ्टिंग अशी प्रोसेस संयुक्तिक ठरते. म्हणजे बायपास किंवा अँजिओ प्लास्टी वगैरे. तिथे हयगय करू नये असं आमचं इंजिनियरिंग शिकवते.
नाही म्हणजे कसं आहे आमच्या इंजिनियरिंग मध्ये एक प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रेडीक्टिव्ह मेंटेनन्स म्हणून प्रकार आहे. ते टेक्निक वापरलं तर ब्रेक डाऊन मेंटेनन्स उशिरा होतो किंवा झालाच तर ते रिपेयर करायला वेळ कमी लागतो किंवा कष्ट ही कमी पडतात. थोडक्यात काय तर बाकीच्या पॅथी आणि योग वगैरे हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स सारखं काम करतात.
नाही म्हणजे कसं आहे की आमच्या इंजिनियरिंग मध्ये दोन्ही प्रकारच्या मेंटेनन्स ला सारखंच महत्व आहे आणि दोन्ही क्षेत्रात काम करणारे लोकं एकमेकांबद्दल आदर बाळगून आहेत. वैद्यकीय क्षेत्रात मात्र कार्डिओलॉजिस्ट मंडळी आयुर्वेद किंवा योग याचं महत्व जाणून आहेत. डीन ऑर्निश पासून अभय बंग, जगदीश हिरेमठ, सुहास हरदास, हे सगळे हृदय विकार तज्ञ दुसऱ्या पॅथीचा नेहमी सल्ला देतात, हा स्वानुभव आहे. दोन महिन्यांपूर्वी मला पोटदुखी कमी व्हावी म्हणून एका प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट ने हरब्लेक्स नावाची हिमालय ड्रग्स कंपनीची गोळी दिली. पण उलटा विचार केला तर बाकी पॅथीचे लोकं ऍलोपॅथी वर विनाकारण आगपाखड करतात असा माझा अनुभव आहे. (अपवाद मंडळींनी स्वतः ला सन्माननीय समजावे.)
म्हणजे कसं आहे की दोन्ही मेंटेनन्स करणाऱ्या लोकांनी एकमेकांच्या इंटेन्शन बद्दल शंका न घेता मशीनची काळजी घेतली की प्लांट मध्ये आनंदी आनंद असतो. बाकी मंडळी सुज्ञ आहेतच.
म्हणजे कसं आहे की आहे हे असं आहे.
(राम म्हणजे राजेश मंडलिक, बी जे मेडिकल चा इंजिनियर. स्वतः ची दोनदा अँजिओ प्लास्टी झाली आहे. मधवबागेची ट्रीटमेंट पण घेतली आहे. योगाभ्यास नियमित करतो.
पत्नी डॉ वैभवी मंडलिक ही एम डी पॅथॉलॉजी आहे.
बायकोची बहीण डॉ क्षितिजा जुजम ही आयुर्वेदिक डॉक्टर आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे योग पंडिता आहे.
सासू सासरे श्री व सौ सोनईकर हे स्वतः योग अभ्यासक आहेत आणि निगडी परिसरात क्लास घेतात.
सांगायचा मुद्दा हा की भृगु, चरक, पंतांजली याचे दाखले कृपया देऊ नये. पूर्ण विचारांती आणि काही स्वानुभव यावरून हे मत मांडले आहे)

No comments:
Post a Comment