माझा एक भाऊ आहे सुहास नावाचा. फॅब्रिकेशन चा बिझिनेस करतो. नासिक मध्ये. सुहास स्वतः बेदम श्रीमंत आहे. नासिक आणि औरंगाबाद मध्ये ८-९ फ्लॅट, साधारण पणे ३० एक एकर ची इगतपुरी आणि सिन्नर साईड ला लँड बँक. लँड बँक, हं, फार आवडता शब्द आहे त्याचा.
सुहास बिझिनेस करतो खरा पण त्याची मॅनेजमेंट स्टाईल एकदम अलग आहे. आरडाओरडा, शिवीगाळ हे त्याच्या ऑफिस मध्ये नेहमी चालू असतं. सप्लायर्स च्या पेमेंट ला डिले हे नेहमीचंच. बँकेचं अकौंट एन पी ए ही त्याच्यासाठी आम बात असते. लोकांकडून पैसे व्याजावर घ्यायचे आणि व्याज बुडवण हे म्हणजे अगदी नेहमीचं. मुद्दल परत देतो उपकार केल्यासारखी. लोकांचे पैसे परत द्यायला त्याच्याकडे पैसे नसतात. असं असताना मागच्या सप्टेंबर मध्ये सुहास बायको पोरांना घेऊन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड ला जाऊन आला.
बिझिनेस म्हणाल तर अडखळत चालू आहे. सुहास ने तुफान ओव्हरट्रेडिंग केलं आहे. साधे फॅब्रिकेशन करता करता अचानक मोठ्या व्हेसल्स बनवायच्या बिझिनेस मध्ये तो पडला. नाशिक जवळ दोन तीन एकराचा प्लॉट घेतला, तिथे मोठी फॅक्टरी बांधली. बँकांची बेधुंद लोन्स उचलली. ती बुडवली. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट चा ससेमिरा लागला. नाना भानगडी.
इतकं होऊनही पठया ऑफिस मध्ये ताठ मानेने बसला असतो. त्याचे देणेकरी पैसे मागायला येतात तेव्हा त्याचा रुबाब असा असतो जणू हाच त्यांना काही मदत करणार आहे. "माझ्याकडे आहेत ना पैसे, म्हणजे रिझर्व्ह बँकेत पैसे आहेत असं समजा" देणेकरी रिकाम्या हाताने परत जातो तेव्हा सुहास सुहास्य वदनाने पुढच्या माणसाची ठासायला सज्ज झाला असतो.
शिवा आयथळ म्हणतो Liars Prosper तसं सुहास चं आयुष्य आहे खरं तर.
वैभवी मला म्हणते "बघा तो सुहास, इतकं बेकार आयुष्य जगून ही स्वतः किती मजेत असतो. काय कारण असेल की नशीब याच्यावर इतकं न्योछावर असेल" मी तिला म्हणालो "नक्कीच सुहास मध्ये एक गुण असा असेल की तो त्याच्या सगळ्या दुर्गुणांवर मात करत असेल. तो गुण कुठला हे मला सापडत नाही आहे. पण जी परिस्थिती त्याने तयार केली आहे त्याच्या मध्यात राहून पंचवीस तीस कोटींचा टर्न ओव्हर करणे खायची गोष्ट नाही आहे"
सुहास बद्दल माझी ही भावना आहे. तीन लाख कोटी टर्न ओव्हर करणाऱ्या आणि भारतात नव्हेच तर जगात अव्वल स्थान पटकावणाऱ्या रिलायन्स बद्दल शेरेबाजी करण्यासाठी माझी बोटं कि बोर्ड बडवायला धजावत नाही हा माझा कमकुवतपणा आहे.
पण एक नक्की की मरायच्या आधी सुहास चा किंवा अंबानी बंधूंचा तो गुण शोधायला आवडेल जो साऱ्या प्रचलित दुर्गुणांवर मात करतोय.

No comments:
Post a Comment