मध्ये एका WA ग्रुपवर एक मित्र म्हणाला "तू (कुणाचातरी) भक्त आहेस"
मी बोललो: नाव, राजेश मंडलिक, वय ४६, रूढार्थाने जग ज्याला मानते तसा दोन पोरांचा बायोलोजीकाल बाप आणि लौकिकार्थाने ३० जणांच्या कुटुंबियांचा भार वाहणारी कंपनी चालवतो म्हणून पूर्ण पुरुष. कुणा माणसावर भक्ती म्हणाल तर माझ्या आई बापावर आणि त्यानंतर…………. स्वत:वर.
बाकी कुणावर भक्ती, माय फूट.
भक्त/भक्ती, फेसबुकीय लिखाणात काही शब्दांचे अर्थ वहावत जातात, भक्ती हा त्याचं उत्तम उदाहरण. खरं तर भक्ती हा अत्यंत पवित्र शब्द. माझ्या मते भक्ती ही आपण अमुर्त अशा गोष्टीवर करतो. कला, खेळ, बुद्धीमत्ता, कर्तृत्व यावर जेव्हा अलौकिकत्व दिसतं तेव्हा आपण स्वत:ला विसरतो आणि अलौकिक रूपावर आपण जे भाळतो ती भक्ती. आणि जी लोकं ह्या अमूर्त गोष्टी आपल्यासमोर घेऊन येतात त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होतो. परवाच परत एकदा ऐकलेलं "सरणार कधी रण" यामधील संगीत/शब्द/आवाज याने मनात जे तरंग उठतात ती भक्ती, झाकिरभाईंचा हात तबल्यावर कडाडल्यावर जी अनुभूति येते ती भक्ती, तेंडुलकर जेव्हा कड़ाकड स्ट्रेट ड्राईव्ह ओढतो तेव्हा जो शहारा उमटतो ती भक्ती, पुल रावसाहेब सांगताना हसता हसता रडवतात तो अनन्य भाव म्हणजे भक्ती, आज जाने की झिद ना करो मधे फ़रीदा खन्नूम खिळवून ठेवते ते खिळणं म्हणजे भक्ती.
पण या फेसबुकवर भक्त आणि भक्ती या शब्दाची पार बोळवण झाली आहे. खरंतर बहुतांश मानवजातीची जर कुठल्या मूर्त व्यक्तीवर भक्ती असेल तर ती स्वत:वर. "देव आपणात आहे, शीर झुकोवनिया पाहे" हे बाबूजी म्हणून गेले तेच खरं तर सत्य. ही अशी पवित्र भावना कुणाच्या पायावर वाहत असेल ही शक्यता कमीच, अन त्यातल्या त्यात ह्या राजकीय नेत्यांवर हे तर अशक्यच.
त्यातही, आपल्या सोयीनुसार या शब्दाचा वापर करायचा. म्हणजे एका पक्षाच्या समर्थकांना हे भक्त म्हणणार. त्याचवेळेस यांचे नेते भ्रष्टाचाराच्या चिखलात गळ्यापर्यंत रूतले आहेत ते विसरणार. दुसरे यांना भ्रष्टाचारी दिसणार पण स्वत:च्या पक्षात घराणेशाही पायी सुंदोपसुंदी चालू आहे ते विसरणार. या असल्या भंगार लोकांच्या चरणी लीन होण्याइतकी तुमच्यामाझ्या सारख्या साध्या लोकांची, हो साध्या सामान्य नव्हे, भक्ती स्वस्त झाली नाही आहे.
विठ्ठलाचं नाव घेत तल्लीन होणार्या ज्ञानेश्वर तुकोबाच्या अभंगात ती दिसते, पावनखिंडीत बाजीप्रभूच्या त्वेषात ती दिसते, रॉजर फ़ेडरर च्या नजाकतदार फटक्यात दिसते ती आणि हो ४५००० rpm चा स्पिंडल रिपेयर करताना राजेश मंडलिकच्या तन्मयतेत दिसते ती..............भक्ती.
तेव्हा मित्रहो, काळाच्या ओघात कित्येक शब्दाच्या अर्थाचे अनर्थ होतात. भक्त/भक्ती या ओवीच्या शब्दाला शिवी चे रूप येऊ न देणे हे तुमच्या माझ्या हातात आहे.
असो. ह्या शब्दाचा कसा वापर करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. मी मात्र माझ्यापुरता हा प्रश्न सोडवला आहे.

No comments:
Post a Comment