मुंबईहून तैपै साठी निघालो. अमेरिकन जेफ अन क्रेग ही होते. मी आपलं चेक इन काऊंटरला सांगायचा प्रयत्न केला की आम्ही तिघं बरोबर आहोत. तर हे दोघेही वेगवेगळ्या काऊंटरवर गेलेही चेक ईन ला. ४७, ६१ आणि ६७ रो. माझा होता ६७ नं. बाजूला गुजराती मुलगा. "सर, वो दोस्त है ७० नंबर पे. विंडो सीट है. एक्सचेंज करेंगे" आज सीट स्वँपिंग. तरी मी खिजवलंच जरा "दोस्त, रातको ११ बजे फ्लाईट निकलेगा, सुबहं ७ बजे हॉंगकॉंग. तो रातमे ऐसा क्या करनेवालों हो आप" की लागलीच "क्या सर, ऐसाभी क्या, प्लीज़ सर" मी दिली सीट एक्सचेंज करून, तर इकडे बाजूला............. चला या वेळेस सस्पेन्समधेच ठेवतो. उगाच एकमेकांच्या मांडीला मांडी न लावणारे अमेरिकन अन बिनकामाचे गळ्यात पडणारे आपण.
*********************************************************************************
चीनची मागील वर्षाची GDP Growth 7.4% झाली. १९९० पासूनचा हा निच्चांक आहे. म्हणजे गेले ३० वर्षे चीन ८% पेक्षा जास्त ग्रोथ अचिव्ह करत होतं. महिन्यापूर्वी एका लेखात मी लिहीलं होतं की हे दोन चार वर्षे दिवे पाजळून काही होणार नाही, तर वर्षानुवर्षे केलं तर दारिद्र्यरेषेच्या वर समाजाचा मोठा भाग येईल. त्याला पुष्टी मिळाली.
********************************************************************************
तैपै १०१ या एकेकाळच्या जगातल्या सर्वात उंच इमारतीच्या ८५ व्या मजल्यावर एका अलिशान रेस्टॉरंट मधे पार्टी झाली. चायनीज कस्टमर्सला उंची दारू पाजणे आणि उत्तमोत्तम पदार्थ खाऊ घालणे, असा द्विकलमी कार्यक्रम होता.
साधारण सहा महिन्यापूर्वी एका लेखात २००५ साली चायनीज बिझीनेसमन बरोबर शांघायमधे रात्रीची जेवणं केली होती अन मला हे बिझीनेसमन बावळट अन आढ्यतेखोर वाटले असा मी उल्लेख केला होता. दहा वर्षानंतर ही मला जाणवलं की त्यात काहीच फरक पडला नाही आहे. ते तसेच वाटले, मुर्ख.
(फ़ार्मा इंडस्ट्रीच्या संबंधित दोघांना माझं बोलणं आवडलं नव्हतं. आधीच सॉरी)

एका डिनरमधे मेन्यु ऑर्डर करताना जेफ तैवानीज होस्टला म्हणाला "Rajesh does not eat beef and pork. Orde........." मी त्याला मधेच थांबवलं. म्हंटलं "भाऊ, तु कर ऑर्डर. आज खाणार. तब्येतीला रेड मीट चांगलं नाही म्हणून जास्त खाणार नाही, पण आज थोडं का होईना खाणार.
महाराष्ट्र सरकारच्या गोहत्याबंदी चा निषेध असा केला.
दोन्ही खाल्लं. बीफ अन पोर्क.
(पण तैवानमधे शेतीला उपयुक्त प्राणी म्हणून आदरापोटी बीफ न खाणारा सेक्ट आहे बरं का!)

Exhibition मधे आमच्या बूथवर दोघी जण होत्या होस्टेस म्हणून. ऑफीसमधेच काम करतात. गुडघ्यावरती दोन इंच स्कर्ट. सजलेल्या नटलेल्या. पण ढुंकून म्हणून बघत नव्हतं त्यांच्याकडे. म्हणजे लोकं बोलायचे, पण कामापुरतं फक्त. लाळघोटेपणा नाही. दोघी हॉटेलवर राहतात. लहान आहेत वयाने. आणि हॉटेलपण ठीक ठाकच असावं. दोघं पोरं पण आहेत. आज जेवलो की त्यांच्याबरोबर. नजरेत वखवख नाही. भंकस नाही.
जेवण करून आलो बाहेर. अन ५-६ सरदारजी अन तैवानीज मुली. आपली मंडळी चाळीशीची अन त्या पोरी विशीतल्या. आपली लोकं म्हणताहेत "please, one photo. And come close. No problem" मग एकाची दुसर्याला टाळी.
शक्यतो परदेशात भारतीय दिसला की मी थोडं का होईना मान वळवून बघतोच. आज मात्र प्रयत्नपूर्वक टाळलं. अन पीटरशी बोलताना मान जरा झुकलेलीच होती माझी.
निर्भयाची डॉक्युमेंटरी, हं............
******************************************************************************
Howard Plaza म्हणून हॉटेल आहे तैपैचं. कमोडचं सीटकव्हर चं टेम्परेचर adjust करता येतं. सकाळी पार्श्वभागाखाला थंड लागू नये म्हणून.
इतकी पण लक्झरी असू नये. अंगावर येते.
असो. उद्याला भेटू परत.
तोपर्यंत निवांत

No comments:
Post a Comment