"हं, काय आहे रे" संजय सर आत येताना म्हणाले. संजय काटकर , हायड्रो फोर्स इंजिनियरिंग या ठाण्यातल्या कंपनीचे डायरेक्टर. मी कोवळा २७ वर्षाचा. बुसाक+शामबान नावाचे हायड्रॉलिक सील विकायचो मी तेव्हा. मी सांगायला गेलो प्रॉडक्ट वैगेरे, तर म्हणाले "अरे, माहित आहे तुझी कंपनी. डिलीव्हरीचा पत्ता नाही, किंमती मनाला वाटेल लावता तुम्ही येडझव्यासारख्या" कॉलेजपर्यंत माझ्याही तोंडून कानाला गुदगुल्या करणारे शब्द नेहमीच पडायचे. एस के एफ मधे पण काही कमी नव्हती. पण नंतर दोन वर्ष हे मंत्रोच्चार कमीच होत होते. बर्याच दिसांनी हा शब्द ऐकल्यावर पहिले मेंदूला झिणझिण्या आल्या अन मनात या संजय काटकर या गृहस्थाबद्दल ममत्व तयार झालं. मी म्हणालो "हे १०० चं सील तुम्हाला आत्ता हवं आहे. किंमत ५८२ रू. उद्या हे सील नाही मिळालं तर कंपनीत परत पाय ठेवणार नाही, अन मिळालं तर हायड्रो फोर्स च्या सिलेंडर मधे बुसाक+शामबान, standardize करायचे. बोला आहे कबूल" तर म्हणाले "डन"
संजय सरांची अन माझी ही पहिली ओळख. सील आलं दुसर्यादिवशी अन कस्टमर-सप्लायर पेक्षा एका वेगळ्याच मित्रत्वाच्या नात्याची नांदी झाली. दोन उच्चशिक्षीत भावांपाठचा हा कमी शिकलेला भाऊ. पण मनाने एकदम दिलदार. मला ते शक्यतो "रामभाऊ" म्हणून हाक मारायचे. त्यांना ड्रिंक्सचं व्यसन होतं. मला ते इतक्यांदा जेवायला घेऊन गेले की त्याची काही गणतीच नाही. अन गंमत म्हणजे ते माझे कस्टमर असून ही, मला एकदाही, and I mean it, बिल देऊ दिलं नाही. मला जेवायला घेऊन गेले की invariably त्यांच्या घरी फोन करायचे "मी राजेशबरोबर आहे" अन ठेवल्याबरोबर मला म्हणायचे "बायकोला सांगितलं ना की मी राजेशबरोबर आहे, की तिला टेन्शन नसतं रे. तिला माहित होतं की मी सज्जन माणसाबरोबर आहे" बरं मिसेस काटकर यांना मी कधीच भेटलो नाही खरंतर.
एकदा मी दादरला एका मोठ्या कंपनीत टेक्निकल डिस्कशन्स साठी गेलो होतो. तिथे माझ्या लक्षात आलं की त्यांचे पॉवर पँक अन सिलींडरचे सप्लायर्स फ़ुल येडं बनवायचे. मी तिथल्या साहेबांना वस्तुस्थितीची कल्पना दिली. मला म्हणाले "सिलींग सिस्टम तुच ठरव अन सप्लायर्सही तुच सांग, सिलींडर अन पॉवर पँकचे" मी त्यांना तीन सप्लायर्स दिले. त्या पैकी हायड्रो फोर्स अन पुण्यातल्या कंपनीने विचारले "तुझं काही कमिशन ठेवायचं का?" मी बोललो "ह्या कस्टमर्स चे जितके प्रोजेक्टस येतील त्यात आमच्या कंपनीचे सील वापरायचे. तेच माझं कमिशन" पहिलीच दणदणीत ऑर्डर मिळाल्यावर योगायोगाने आम्ही कोकणात किहीम बीचजवळ संजय सरांच्या घरी त्यांच्या आईच्या हातचं माशांचं कालवण जेवत होतो. संजय साहेब म्हणाले "बघ ५% ठेवणं काही अवघड नाही, विचार कर" मी म्हणालो "तुमच्या आईच्या हातचं जेवण माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे, कमिशनपेक्षा" "रामभाऊ, जिंकलंस लेका" असं म्हणत जोरात पाठीत धपाटा घातला. (पुढं दहा वर्षात तीन कंपन्यांनी दादरच्या कंपनी बरोबर ५० कोटीचा बिझीनेस केला. मी कंपनी सोडल्यावरही बुसाक चे सील च वापरत राहिले, अजूनपर्यंत. अन पुण्यातल्या कंपनीच्या मालकाने मी बिझिनेस चालू केला तेव्हा खूप मदत केली)
आम्ही खूप फिरलो. एसार स्टील हझीरा, विंडसर छत्राल आणि अशा बर्याच ठिकाणी मी triangular working करायचो. म्हणजे माझेच कस्टमर मी तिकडे त्यांचे सप्लायर म्हणून recommend करायचो. त्याचा खूप फायदा झाला. माझे कस्टमर म्हणून तर ते घट्ट झालेच पण त्यापेक्षा ते माझे सॉलिड जवळचे मित्र झाले. खरं तर मी hydraulics चं स्पेलिंग हि विसरलो आहे. तरीही मी अजून अशा बर्याच कस्टमर च्या संपर्कात आहे.
मी नोकरी सोडून बिझिनेस चालू करायचं ठरवल्यावर त्यांनी मला बोलावलं. त्या दिवशी ठाण्यात वागळे मध्ये द्वारका काय ते हॉटेल आहे, तिथे राहिलो. त्यांनी खूप ड्रिंक्स घेतले. मला म्हणाले "साल्या, विसरू नकोस आम्हाला. आणि कधी पैशाची मदत वैगेरे लागली तर सांग." ते आणि मीच होतो. भरपूर गप्पा मारल्या. निघताना प्रेमभराने मिठी मारली.
पण हि दारू फार बेकार चीज आहे. एखाद्याचं लिव्हर खराब करताना, ती दारू, त्याचं हृदय किती मोठं आहे वैगेरे बघत नाही. पोखरतच ते. जे व्हायचं, तेच झालं. २००४ साली, संजय सर हे जग सोडून निघून गेले. मी औरंगाबाद ला होतो. नाही जाऊ शकलो, अंत्यविधीला.
तीन चार वर्षा खाली एक फोन आला "काय रामभाऊ" आणि पाठोपाठ ते गडगडाटी हास्य, हा हा हा. सटपटलोच मी. "अरे, मी अजय बोलतोय, संजयचा मोठा भाऊ" आणि मग ते बोलत राहिले, ४-५ मिनिटे. काय बोलले, मला काहीच आठवत नाही कारण मी मनाने संजय सरां बरोबर किहीम बीच जवळच्या त्यांच्या गावात त्यांच्याच आईच्या हातचे सुरमई खात होतो.

No comments:
Post a Comment