एखाद्यानं सांगावं आणि मी डोकं झुकवावं अशा काही मोजक्या व्यक्ती आहेत. न्हावी हा त्यापैकी एक. तो, पहिला रविवार कारंजा नासिकचा. दुसरा औरंगाबादचा असावा. पण त्या काळात माझं स्वत:कडे इतकं कमी लक्ष होतं की तो मला आठवत नाही. तिसरा अशोकनगरचा शामभाऊ आणि आताचे रिझवानभाई. लहानपणी नशिकला रविवार कारंज्यावर कोपर्यावर न्हाव्याचं दुकान होतं. बाबा तिथे आम्हाला सोडायचे. एकच सांगून जायचे "बारीक करा". हे बारीक करा सांगणं डोक्यात इतकं फिट बसलं आहे की आजही मी तीच विनंती करतो. हो, मग वस्तरा, कात्री वैगेरे भीषण हत्यारं हातात असणार्याला आपण फक्त विनंती करू शकतो, आज्ञा नाही. पण एक आहे, हत्यारांचा धाक असला तरी इतक्या प्रेमाने माझ्या गालावरून हात फिरवण्याचे मोहक काम अजून कुणी दुसर्या पुरूषानं केल्याचं मला तरी आठवत नाही. (पुरूष महत्वाचा शब्द आहे). शक्यतो, आपल्या नकळत, चुकून अंगावर पाणी पडलं तर आपण दचकतो. पण न्हावी पाण्याचा फवारा उडवणार हे माहित असतं, तरीही मी दरवेळेस दचकतो, invariably. कटिंग झाल्यावर तो न्हावी डोक्याच्या मागचा कट व्यवस्थित झाला हे दाखवण्यासाठी आरसा धरतो. त्या आरशात बघून मी आजतागायत काही सुधारणा सुचवली असेल असं मला तरी आठवत नाही.
सांप्रतकाळात दुनियेचा विसर पाडायला लावणारे, रिझवानभाई. छोटंसंच दुकान आहे घराजवळ. वय असेल ६५ च्या आसपास. थरथरत्या हाताने डोक्यावरून कंगवा आणि कात्री फिरवतात, ते बहारदार असतंच. पण कटिंग झाल्यावर ते नवरतन टाकून डोकं बडवतात ना, तेव्हा साली मेंदूवर चढलेली निराशेची पुटं पटापटा झडत जातात. रिझवानभाईंनी जो माझा मिलीटरी कट निवडला आहे त्याला तर तोड नाही. त्यामुळे खुप फ़ायदे होतात. ट्राफीक हवालदार, आर्मीचा माणूस म्हणून सोडून देतो, रेल्वेत एखादी सुंदरी, डिफेन्सच्या माणूस म्हणून आदराने बोलते. मुळात बथ्थड असलेल्या चेहर्याला जरा राकट रूप येतं. एकदा सदर्न कमांडच्या इथे चालत असताना तर एका मिलीटरीच्या जवानाने मला कडक salute मारला. मी पण निर्लज्जासरखा reciprocate केलं. च्यायला मी खरं कोण कळलं असतं तर पोकळ बांबूचे फटके टाकले असते. असो. पण डिप्लोमानंतर मला फार इच्छा होती, आर्मीत जावं म्हणून. SSB भोपाळला जाणार पण होतो. पण परीक्षेची गडबड झाली अन मी मग असा डमी आर्मीमन होण्यात आनंद मानत राहिलो.
नंतरची चकाचक दाढी. माझ्यासाठी त्यांनी जरा स्पेशल ब्लेड आणून ठेवलं आहे. आणि मग ते ओल्ड स्पाईस टाकत जेव्हा गालावर हात ठेवतात. अहाहा. सुख हो, निव्वळ सुख. आणि मग तो स्क्रब लावून केलेला फेसमसाज. साला, रंग गेला तर पैसे परत असा आमचा चेहरा. पण त्यालाही तरतरी आणण्याचं काम रिझवानभाई न कंटाळता गेले दशकभर करत आहेत.
मधे एकदा मी खुर्चीवर बसलो असतानाच दरदरून घाम फुटला. रिझवानभाई दुकानाबाहेर घेउन जात असतानाच धडपडलो. दुसर्या दिवशी अमेरिकेला जाणार होतो. कसंबसं सावरलं स्वत:ला. डॉक्टरने परवानगी दिली. रिझवानभाईंनी त्या आठवड्यात चार वेळा विचारलं "साब ठीक है क्या?". पण त्या घटनेपासून रिझवानभाईंचा हात माझ्या डोक्यावर पडताना आधीपेक्षा जास्त थरथरतो हे जाणवतं मला.
नीलच्या जावळापासून ते बाबा कँसर ने आजारी असताना घरी येऊन दाढ़ी करताना त्यांच्याशी गोड बोलत त्यांना फ़्रेश ठेवणारे रिझवानभाई. केसाने गळा कापणार्या लोकांच्या मांदियाळीत केस कापताना प्रेमाची पखरण करणारे रिझवानभाई. एकदा डोकं त्यांच्या हातात गेल्यावर दीड दोन तास आयुष्यातल्या तमाम प्रश्नांना विसरायला लावणारे रिझवानभाई.
सलाम! रिझवानभाई समोर मी नतमस्तक होतो अन त्यांना वाटतं, मी म्हणतोय "चला, कटिंग चालू करा" ते बिचारे कात्रीचा कट कट आवाज चालू करतात.

No comments:
Post a Comment