लहानपणी मला दोन प्रोफेशन चं विलक्षण आकर्षण होतं. एक होतं स्कुटर मेकॅनिक आणि दुसरं मिलिटरी.
नासिक ला असताना माझ्या एका मित्राचं सायकल रिपेयर करण्याचं दुकान होतं. तिथे सायकल रिपेयर करायला किंवा हवा भरायला नेली की मी तासनतास सायकल सर्व्हिसिंग बघत बसायचो. तो मित्र आम्हाला पंपाने हवा भरू द्यायचा. मला फार मजा यायची. हाच नाद पुढे स्कुटर रिपेयर कशी करतात हे बघण्यापर्यंत वाढला. स्पार्क प्लग साफ करणे ही कृती म्हणजे सुखाची परमावधी असायची. किंवा पूर्वी बजाज ला पावसात एक टिपिकल प्रॉब्लेम येऊन स्कुटर बंद पडायची. तो प्रॉब्लेम म्हणजे इंजिन जवळ एक कॉइल असायची अन तिच्यावर पाण्याचे थेंब पडले की स्कुटर बंद व्हायची. ती कोईल कोरडी करून स्कुटर चालू केली की मला कोण आनंद व्हायचा. बऱ्याचदा स्वप्नात मी '' ए शंकऱ्या १२-१३ चा पाना घे" असं ओरडतो आहे आणि स्कुटर्स पटापट रिपेयर करतो आहे असं यायचं.
पुढे आयुष्याचं दान वेगळं पडलं आणि मी मेकॅनिक चा मेकॅनिकल इंजिनियर झालो. पण आजही कार पंक्चर झाली की टायर बदलायला मला फार आवडतं. आणि कधी पंक्चर काढण्यासाठी मला स्वतः ला दुकानावर जावं लागलं च तर ट्यूब मध्यें हवा भरल्यावर त्या माणसाने पाण्याच्या टबात ट्यूब टाकल्यावर जे हवेचे बुडबुडे येतात त्याने त्या दुकानदारापेक्षा मीच जास्त हरखून जातो. आणि त्याने त्या टायर मधून काढलेला आता पर्यंतचा प्रत्येक खिळा मी जणू काही हा प्रकार पहिल्यांदाच बघतो आहे, तितक्याच उत्कंठतेने आजतागायत बघत आलो आहे.
आणि दुसरं म्हणजे मिलिटरी. का कोण जाणे मला सैनिक व्हायचं कुठून डोक्यात घुसलं ते काही आठवत नाही. पण पाचवीला मला साताऱ्याच्या सैनिक स्कुल मध्ये ऍडमिशन मिळाली होती. आईने पार रडून गोंधळ घातला आणि मी मग नाशिकला पुढचं शिक्षण पूर्ण केलं. औरंगाबाद ला असताना एका भावाला भेटायला शिवाजी प्रेपरेटरी स्कुल मध्ये जाणं झालं तेव्हा मला त्याचा मनस्वी हेवा वाटला. पुढे डिप्लोमा ला सुद्धा मला सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाचा भोपाळ चा कॉल आला होता. पण ज्या दिवशी टेस्ट होती त्याच दिवशी फायनल ची ओरल आली आणि माझा तिथे जायचा चान्स हुकला.
आमच्या न्हाव्याने मला एकदा विचारलं "मिलिटरी कट करू का?" मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. तेव्हापासून मी मिलिटरी कट च सांगतो. परत केस वाढेपर्यंत का होईना आरशात बघितल्यावर मी साध्या वेशातील सैनिक असल्याचा भास होतो. एकदा ट्रेन मध्ये असाच मिलिटरी कट करून प्रवास करत होतो आणि नेताजींचा सैनिकी वेशातील फोटो असलेलं विश्वास पाटलांचं महानायक वाचत होतो. ते पाहून शेजारची एक उत्तर भारतीय तरुणी, अर्थातच सुंदर, म्हणाली "भैया, आप डिफेन्स मे हो" हा प्रश्न ऐकून मला इतका आनंद झाला होता की ती मला भैया म्हणल्याचं जाणवलं पण नाही.
काही वर्षांपूर्वी बिशप स्कुल मध्ये गॅदरिंग ला कर्नल ललित राय म्हणून कारगिल मध्ये शौर्य गाजवलेले, प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी जी कथा सांगितली त्यावेळी अक्षरश: मी रोमांचित झालो होतो. भाषणाच्या शेवटी जेव्हा त्यांनी "भारत माता की जय" असा नारा दिला तेव्हा माझ्या सब कॉन्शस माईंड मधला तो सैनिक उभ्या जागी थिजला होता.
आजही कधी मिलिटरी कट केल्यावर सदर्न कमांड च्या भागात मी जॉगिंग ला गेलो की तिथला एखादा सेंट्री मला ''जयहिंद साब" म्हणत सलाम ठोकतो. तेव्हा मी खरं कोण आहे हे कळलं तर पोकळ बांबूचे फटके बसतील याची तमा न बाळगता मी पण पटकन "जयहिंद" म्हणत त्याला रिस्पॉन्स देतो. त्यावेळी मी खरं तर औट घटकेचा का होईना, इंडियन आर्मी चा जवान होतो. आणि पुढे गेल्यावर मनोमन लष्कराबद्दलची कृतज्ञतेची भावना अंगभर सरसरत जाते.
असे हे दोन प्रोफेशन. एकमेकांपासून एकदम अलग. जर आयुष्य परत रिवाईंड झालं तर यापैकी एक व्हायला नक्कीच आवडेल.

No comments:
Post a Comment