Friday 11 March 2016

Entrepreneurship Development

पोस्ट टाकली अन बऱ्याच लोकांनी विचारलं की व्हिडियो नाही का? अगदी खरं सांगू, मी पहिल्यांदाच हे भाषण वगैरे करत असल्यामुळे ते काही सुचलंच नाही. तर जे काही सांगितलं ते संक्षिप्त रुपात लिहायचा प्रयत्न करतो आहे.

- मुळात Entrepreneur(उद्योजक) हे नाम नाही आहे ते विशेषण आहे. तो एक गुण आहे. त्यामुळे उद्योजकता ही जितकी व्यावसायिकाच्या अंगात असते तितकीच नोकरी करणाऱ्या माणसाच्या अंगात असते. त्यामुळे उद्योजक आणि व्यावसायिक हे समानार्थी शब्द नसून ते फार तर पूरक शब्द आहेत. आणि उद्योजकता हा शब्द नोकरदाराला पण लागू होऊ शकतो.

- काय फरक आहे उद्योजक आणि व्यवसायिक मध्ये. तर उद्योजक हा बिझिनेस चा पूर्ण पणे नवीन मार्ग दाखवतो. मग ते प्रोडक्ट च्या संदर्भात असेल नाही तर व्यवसाय करण्याच्या पद्धतीत असेल. व्यावसायिक मात्र मार्केट मध्ये अस्तित्वात असलेला मार्ग चोखाळतो. साधारणपणे व्यावसायिक हा व्यवसायाचा उद्देश हा कमर्शियल ठेवतो तर उद्योजक मात्र value creation चं काम करतो. त्याच्या आणि बिझिनेसच्या संदर्भातील कनेक्टेड गोष्टी मध्ये बदल घडवायचा प्रयत्न करतो. व्यावसायिक लोकांना अशी वागणूक देतो की बिझिनेस ची ग्रोथ होईल, तर उद्योजक बिझिनेस ची अशी जडण घडण करतो की लोकांची ग्रोथ होईल. कोणताही निर्णय घेताना व्यावसायिक calculation मध्ये गढलेला असतो त्यामुळे रिस्क कमी घेतो, तर उद्योजक analytical approach बरोबर intuition चा आधार घेतो, त्यामुळे त्याच्या निर्णय प्रक्रियेत रिस्क असते. व्यावसायिक मार्केट मध्ये स्वत:साठी जागा बनवतो तर उद्योजक स्वत:साठी नवीन मार्केट शोधतो.

- ज्या नोकरदारांमध्ये उद्योजकता असते त्यांना Intrepreneur म्हणतात. अंतर्गत उद्योजक. साधारणपणे हे Intrepreneur लोकं नोकरीच्या ठिकाणी टॉप पोझिशन ला जातात नाही तर मग Entrepreneur बनतात.

- उद्योजकाच्या बिझिनेस चालू करण्याच्या पहिल्या चार स्टेप असतात. तो बिझिनेस हा छंद म्हणून चालू करतो. तेव्हा काही भव्य दिव्य आपल्याकडून घडेल हे त्याच्या ध्यानीमनी नसतं. मग तो त्याच्या कडे व्यवसाय म्हणून पाहू लागतो. आणि सप्लायर आणि कस्टमर यांच्याशी नेट्वर्किंग करू लागतो. मग हळू हळू स्वत:ची टीम जमवू लागतो. आणि मग साधारण पणे काही वर्षात त्याला व्यवसायच रूप येतं. या ठिकाणी व्हिजन, मिशन, strategy यांचा वापर करून पुढचा road map ठरवावा लागतो.

- स्वत:ला व्यवसायापेक्षा मोठं समजू नका. व्यवसायाकडे त्रयस्थ नजरेने बघा. 

- बिझिनेस करताना लोकांचा पगार, सप्लायर्स चे पैसे आणि बँकेचे हप्ते वेळेवर द्यायचा आटोकाट प्रयत्न करा. अगदी जीवाच्या पलीकडे जाऊन. 

- बँक तेव्हाच तुम्हाला लोन देईल जेव्हा तुम्हाला त्याची गरज नसेल. लोन हवं असेल तर balance sheet स्ट्रॉंग बनवा. दारासमोर BMW आहे अन Balance Sheet स्ट्रॉंग नसेल तर बँक लोन देणार नाही. बँकेबद्दल कितीही मिस कन्सेप्शन असतील तरी लोन घेण्यासाठी बँके इतका trusted पार्टनर दुसरा नाही. रादर बँक आपलं जितकं लोन approve करते, आपण तितकेच पैसे  उचलायला लायक असतो. बँकेकडून लोन घेऊन परत बाहेरून पैसे उचलायचा वेडेपणा करू नका.  

- काही मुद्दे सांगितले.
१. Be open to change. Do not resist change. Change is always for good. Change is short term. Transformation is long term. Change is starting point of transformation. Aim to transform the thing. 
२. Cash flow is reality. Profits are notional. 
३. Act. Action is more important, even if it proves wrong, than not acting at all. The consequences of mistakes out of action is normally of lesser magnitude than not acting. You have to break an egg if you want to eat an omelet. Do not procrastinate. Action delayed is action denied.  
४. Think on broader scale. Do not let your thought process hover around you and your family. Think beyond that. Think for your colleagues, society and most important, the nation. तुमच्या टर्नओव्हर ची सांगड, भले तो कितीही कमी असू दे, देशाच्या GDP शी लावली, मग तो fractional percentage मध्ये असे ना का , की व्यवसायाचा उद्देश बदलून जातो. 
५. Aim to goal. Simply dribbling a ball will not allow you to lift a trophy. Pushing a ball in to net will.
६. Be an employee, be an employer. उद्योजकता अंगात असेल तर मग नोकरी करा व व्यवसाय, यश तुम्हाला जवळ करणार. 

अजून बरेच मुद्दे आहेत, पण ते खूप पाल्हाळ लावल्यासारखं होईल. महत्वाचे मुद्दे वर कव्हर केले आहेत. यातले काही पुस्तकी आहेत तर बरेच माझी मतं आहेत. कुणाला त्यावर चर्चा करायची असेल तर स्वागत आहे. कदाचित माझेही काही मिस कन्सेप्शन दूर होतील. 

एखाद्या रम्य संध्याकाळी यावर चर्चा करण्यासाठी तुमच्या बरोबर बसायला आवडेल………चहा प्यायला हो! तुम्हाला काय वाटलं? 





No comments:

Post a Comment