२०१२ साली मी आणि माझ्या पार्टनर ने आमचे स्टेक सेट्को ला विकले, तेव्हा आम्हाला पहिला प्रश्न विचारला "का विकली तुम्ही कंपनी" अवघड प्रश्न खरं तर. आमचीच ब्रेन चाईल्ड असलेली कंपनी, जी आम्ही गोर्यांना विकली. काही जणं genuinely प्रश्न विचारायचे. पण बर्याच जणांचा भाव असा असायचा की "येडे आहात का तुम्ही कंपनी विकता आहात?" जेव्हा बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने हाच प्रश्न विचारला तेव्हा मला ही हाच प्रश्न पडला "मूर्ख आहोत का आपण, कंपनी विकली ते?" खरं तर हे करण्यामागचे काही कारणं होती जी मला पक्की माहित होती, पण जवळचे, दूरचे मधील बरेच जणं हे विचारीत तेव्हा माझाही आत्मविश्वास जरा डळमळला. मला जरी उत्तरं माहित होती तरी लोकांच्या मनातील विचार ऐकून मला धक्का बसायचा.
पहिला डायलॉग.: "बघ भावड्या, पुढच्या तीन वर्षात तुला कंपनीच्या बाहेर फेकलेलं असेल. मग बसा बोंबलत" joint venture चं चौथं वर्षं चालू आहे आणि असं काही पुढच्या ७-८ वर्षात तरी होण्याची सुतराम शक्यता नाही आहे. किंबहुना प्रकृती मुळे मीच जरा डचमळलो तेव्हा या गोर्यांनी माझं मनोधैर्य उंचावलं. अगदीच खरं सांगायचं तर प्रोफेशनल नात्यापलीकडे जाऊन मैत्रीचे बंध घट्ट होत चालले आहेत.
दुसरा डायलॉग: 'बघा बॉस, कुणीतरी अमेरिकेहून येईल अन बसेल तुमच्या बोकांडी. मग नाचा तो सांगेल तसं" अगदी खरं सांगू, असं काहीही घडलं नाही. JV होण्या आधी मी जशी बिझिनेस ची वाट लावायचो तशीच आज ही लावतो आहे. आज ही आधी सारखी मनमानी चालू आहे. खरं तर जेफ आणि क्रेग आम्हाला नवनवीन गोष्टी करायला भरीस पाडतात. चेन्नै सर्व्हिस सेंटर चालू करणं हे आर्थिक दृष्ट्या फार अवघड नव्हतं, पण ते चालू करताना जो मोरल सपोर्ट लागतो तो नक्कीच त्यांनी दिला.
"बघ हं, तुमचं नाव मार्केट मधून गायब होईल. आणि ते झालंही. पण त्यांच्या मुळे नाही तर मीच त्यांच्या मागे लागलो की आपण अल्ट्रा प्रिसिजन नाव बदलून सेटको स्पिंडल ठेवू यात. आणि या मागे काही कारणं होती. आणि हे डिसिजन घेतल्याबद्दल मला अजिबात वाईट वाटत नाही आहे.
मला नेहमीच आश्चर्य वाटत आलं आहे की काय कारण असेल की हजारो मैल दूर असलेल्या एका मोठ्या कंपनीच पुण्यातल्या एका छोट्या कंपनीबरोबर व्यवस्थित पार्टनरशिप चालू आहे. बाकी काहीही कारणं असोत, एक कारण मात्र छातीठोकपणे मी सांगू शकतो आणि ते म्हणजे व्यवहारातील पारदर्शकता. JV चालू झालं तेव्हा आम्ही आठवड्यातून एकदा फोन वर बोलायचो. आता आम्ही महिनो न महिने फार बोलत नाही. झालंच तर चार महिन्यातून एक मिटिंग होते. कंपनीसाठी काही गोष्टी सगळे मिळवून ठरवतो आणि त्यावर अंमलबजावणी करतो. वाद होतात, नाही असं नाही पण दोघांना माहित असतं की हे कंपनीच्या फायद्यासाठी आहे. वैयक्तिक अहंकार कुरवाळायला कुणीही बांधील नसतं.

हे मी का सांगतोय? तर बर्याच छोट्या व्यावसायिकांना या JV प्रकाराबाबत एक अढी असते. पण तुमच्या कंपनीपेक्षा तुम्ही स्वत:ला मोठे समजत नसाल आणि एखाद्या तटस्थासारखे आपणच उभ्या केलेल्या बिझिनेस कडे पाहत असाल, तर JV सहज होतं आणि त्यात काम करणे हा एक आनंददायी अनुभव असतो.
No comments:
Post a Comment