मी लहानपणापासून वयाने मोठं असलेल्या आणि माझ्या मनात ज्यांच्या बद्दल प्रेमादर आहे अशा लोकांच्या पाया पडतो. हो, दोन्ही क्रायटेरियात बसली पाहिजे समोरची व्यक्ती. वर्ष सरली. ज्यांचे पाय धरावेत अशा मोजक्या व्यक्ती आजकाल भेटतात.
असो.
एक माझं निरीक्षण असं आहे की पूर्वी पाया पडताना पूर्ण वाकून आम्ही चरणस्पर्श करायचो. मधल्या काही काळात असं बघायचो की लोकं अँकल ला स्पर्श करून नमस्कार करायचे. हळूहळू ते पायाच्या पोटरीला स्पर्श करून नमस्काराचा सोपस्कार पार पाडत होते.
परवा एका लग्न समारंभाला गेलो होतो तिथे आजकालची पोरं, समोरच्या व्यक्तीच्या गुडघ्याला टच करून नमस्कार केल्याचं दाखवत होते.
याच स्पीडने नमस्काराची जागा शरीराच्या वरच्या भागात सरकत गेली तर.............
आवरतो.
😊😊

No comments:
Post a Comment