चव्हाण वाडा, कोर्ट गल्ली, नगर. विवेकच्या आईने बनवलेलं चविष्ट मटनाचं तुडुंब जेवण करून आम्ही ४-५ जण वाड्याच्या गच्चीत रात्रीचं पहुडलो होतो. वरती निरभ्र आकाश आणि लुकलुकणार्या चांदण्या. गप्पांची मैफल. पॉलीटेक्निकचे मित्र. रात्री २ एक ची वेळ. डोळा लागून अर्धा तासंच झाला असेल. अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज चालू झाला. माझी झोप चाळवली. भुंकण्याचा आवाज टिपेला पोहोचल्यावर पांघरूण सारून मी पाहतोय तर रस्त्यावर मधोमध एक गावाकडचा माणूस उभा होता. रस्त्यावरच्या लाईटच्या प्रकाशात लख्खच दिसत होतं. पांढरा शर्ट, धोतर, डोक्यावर लालसं मुंडासं, हातात पिशवी. अन त्याच्या भोवती गोल करून ५-६ गावठी कुत्री. मरतुकडीच पण जंगली कुत्र्याचा आव आणणारी. बेफाम होऊन भुंकत होती त्या माणसावर. अन तो माणुस हतबुद्ध होऊन बघत होता. असहाय्य. परिस्थितीने इतकं लाचार बनवलं होतं की कुत्र्याला हाड म्हणायचंही त्याला सुधरत नव्हतं.
मी इकडेतिकडे बघितलं. गच्चीतच मला एक दगड दिसला. उचलला आणि नेम धरून एका कुत्र्याच्या दिशेने भिरकावला. बरोबर पेकाटात बसला त्याच्या. गावठीच कुत्रं ते. कुई कुई करत पळून जाऊ लागलं. आणि ते बघून बाकीच्या कुत्र्यांची पांगापांग झाली.
दोन हाताने खालूनच त्या अनाहूताने मला आशिर्वाद दिले. हसला असावा.
मी परत पांघरूणात येऊन झोपलो.
शांत.
तेव्हाही परिस्थिती बिघडलीच होती. मी मधोमध उभा होतो प्रॉब्लेम्सच्या गराड्यात. एक एक प्रॉब्लेम दात विचकत माझ्याकडे पाहत खिदळत होता. अन मी असहाय्य. अगतिक. मार्ग काही दिसत नव्हता.
प्रकाशाच्या तिरीपेकडे बघत असतानाच तु दिसलास. माझा मित्र. उभा होतास वर हसत. मी ही तुझ्याकडे आश्वासक नजरेने बघत होतो. मला वाटलंच होतं की माझी मदत करायला तु असशीलच. मला दिसला तुझ्या हातात दगड. अणकुचीदार. आणि भिरकावलास तु बरोबर नेम धरून.
ही कपाळावर झालेली जखम भरून येईलही रे. पण मनावरचा घाव मात्र तसाच राहील.
अंतापर्यंत.

No comments:
Post a Comment