ITI ते IIT. अभियांत्रिकी शिक्षणाची एक मस्त चेन बांधली आहे शासनाने.
ITI मध्ये बेसिक शिक्षण आणि मुख्य म्हणजे ट्रेड शिकवला जातो. मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रिशियन वैगेरे. उपकरणांची हाताळणी कशी करावी याचं शिक्षण दिलं जातं. पूर्वीच्या काळी जनरल पर्पज मशिन्स होत्या तेव्हा तर त्यांचं महत्व वादातीत होतं. आणि मग ITI ला NCTCVT ची जोड मिळाली आणि उत्तमोत्तम टेक्निशियन लोकांची फौज इंडस्ट्री ला मिळू लागली.
मग डिप्लोमा. प्रक्टिकल आणि थेअरी याचा चांगला संगम. म्हणजे तुम्हाला वर्कशॉप मध्ये बर्यापैकी काम करावं लागायचं आणि त्याबरोबर पुस्तकी अभ्यास पण आहे. थोडं कम्युनिकेशन स्किल्स. गणित, डिझाईन, drawing वैगेरे विषयावर हात साफ करावा लागतो.
पुढचा टप्पा graduation. इथे पण वर्क शॉप मध्ये काम असतच पण थेअरी वर जास्त भर. Management चे विविध विषय हाताळले जातात. डिप्लोमा ला जो syllabus असायचा त्याची पुढची पायरी.
आणि शेवटचं म्हणजे IIT. टेक्निकल competence चा अर्क. प्रत्येक विषयची जय्यत तयारी. रिसर्च बेस अभ्यास.
जग बदलत गेलं. नवनवीन तंत्र विकसित होत गेली. जनरल पर्पज मशिन्स जाऊन स्पेशल पर्पज, मग NC आणि मग CNC मशिन्स मार्केट मध्ये येऊ लागल्या. PLC, CNC आणि त्यांचे mechanical पार्ट शी कम्युनिकेशन हे कळीचे मुद्दे बनले. प्रोफ़िबस, इथरनेट हे परवलीचे शब्द बनले. Mechatronics ही एक नवीनच बरंच उदयाला आली.
mechanical साईड जर तुम्ही अभ्यासली तर अगदी हा सुर्य आणि हा जयद्रथ. लपवाछपी नाही. आवाज येतो, बेयारिंग बघा, गियर पहा वैगेरे. बदला गोष्ट चालू. इलेक्ट्रोनिक्स चं तसं नाही. डायोड, रेझिस्टर, capacitor मध्ये ती न दिसणारी उर्जा खेळत राहते आणि काही प्रॉब्लेम आला तर शोधणं मुश्किल. छुपे रुस्तुम, म्हणून इंडस्ट्री त मेंटनंस डिपार्टमेंट चे प्रमुख इलेक्ट्रोनिक्स चे असतात. असो थोडं विषयांतर.
प्रॉब्लेम असा झाला की तंत्र प्रगत होत गेली पण ITI, डिप्लोमा आणि इंजिनियरिंग चा अभ्यास मात्र काही बदलला नाही. IIT बद्दल मला माहित नाही त्यामुळे तिथे तारे तोडायला नको. आणि मग डिप्लोमा ची मुलं CNC मशिन्स चालवण्याच्या नावाखाली कंपनीत काम करू लागली. आणि ITI मुलं पडेल ती कामं करू लागली. सिस्टम ला अपडेटेड ठेवलं नाही तर त्याचे काय दुष्परिणाम होतात याचं हे उत्तम उदाहरण. माझ्याकडे डिप्लोमा झालेली मुलं मशीन चालवयाच काम मागायला येतात. मी त्यांना कम्पलसरी इंजिनियर चं काम देतो. The only reason is that they are not meant to run the machine.
ITI चालवणारे प्राचार्य आणि डिप्लोमाचे प्राचार्य यांना माझं नम्र आवाहान आहे की इंडस्ट्री त जाऊन भेटा. तिथे काय बदल घडले आहेत त्याचा अभ्यास करा, ते शासनाला कळवा, त्यांच्याकडून syllabus मध्ये बदल करवून घ्या. मी स्वत: ४ एक वर्षापूर्वी ४-५ ITI मध्ये गेलो आणि ट्रेनिंग ऑफर केली पण कुणीही इंटरेस्ट दाखवला नाही. balancing मशीन चालवण्यासाठी मी गेले वर्ष भर माणूस शोधतो आहे. मिळाला नाही.
जुन्या आणि नव्याची सांगड अशी घालायची. ITI ते IIT हि सुंदर साखळी आहे. तिच्या करिक्युलम मध्ये बदल करून, नाविन्याची जोड देऊन Make In इंडिया ला हातभार लावण्याची ही तुमची, माझी आणि शासनाची नैतिक जबाबदारी आहे.

No comments:
Post a Comment