Breaking the glass ceiling हा वाक्प्रचार ऐकला आहे का कधी? अमेरिकेतल्या बायकांसाठी तयार झालेला. कार्पोरेट लॅडर वर चढताना अशी एक वेळ यायची की यापुढे आपण जाऊ शकतो पण फॉर सम रिझन नाही जात. वरची पोस्ट दिसते, खुणावतीय पण नाही पोहचू शकत.
स्त्रियांपर्यंत मर्यादित असलेला हा फंडा आता कंपन्यांना पण लागू झाला आहे. Hitting the glass ceiling. काय आहे हा प्रकार, ग्लास सिलींग:
सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला कुणी सांगत नाही की तुमचं डोकं ग्लास सिलिंगला धडकलं आहे ते. आता काचेचं सिलिंग ते. तुम्ही त्याच्या पल्याड बघू शकता, साहजिकच आहे ते, शेवटी ग्लास आहे पारदर्शक. संधी फेर घालत असतात, कळतातही तुम्हाला. पण तुम्ही त्या संधींना पकडू नाही शकत. एक अदृश्य शक्ती असते जी तुम्हाला त्या संधीला आवाक्यात आणण्यापासून परावृत्त करते.
आणि हो, याचा अर्थ असाही नाही की तुमचा परफॉर्मन्स चांगला नाही आहे. त्याचा अर्थ इतकाच की तुमच्या अंगभूत गुणांचा तुम्ही पूर्णार्थाने वापर करत नाही आहात.
शक्यतो धंदेवाईक किंवा फॉर दॅट मॅटर नोकरदारांच्या करियरमधे पाच वेळा हा Hitting the Glass Ceiling ची वेळ येते. मी धंदेवाईक नोकरदार माणूस. त्यामुळे जेव्हा मी वाचलं या बद्दल तेव्हा लागलीच क्लिक झालं.
- पहिल्यांदा हॉबी बिझिनेस म्हणून चालू होतो. भातुकलीचा खेळ. थोडी मजा, थोडा सिरियसनेस. मनातल्या सुप्त भावनांशी आपणच छेडछाड चालू करतो.
- इथे ग्लास सिलिंग तोडलं की छोटासा धंदा म्हणून बस्तान बसवायचा प्रयत्न. इकडचे तिकडचे रिसोर्सेस गोळा करतो, नेटवर्कींग करतो. थोडक्यात हात पाय मारायला चालू करतो. सुप्त भावना आता हळूहळू स्वप्न होऊ पाहतं.
- याच्या पुढची स्टेज असते ती उद्योजक म्हणून घेण्याची. छोटी टीम बनते. चार पाच लोकांच्या मदतीने नैया हाकू लागतो. स्वप्नाचं रूपांतर आता ध्येयात होतं.
- स्टेज ४ मधे ऑर्गनायझेशन थोडी मोठी बनते. डिपार्टमेंटस तयार होतात. तुमच्या ध्येयाला आता आकांक्षाचे पंख फुटु लागतात.
- आता तुम्हाला लोकं व्यवसायिक वैगेरे बिरूदं लावायला लागतात. कंपनीत स्ट्रक्चर्ड ऑर्गनायझेशन बनत जाते. मग स्ट्रॅटेजिक प्लानिंग वैगेरे मोठमोठे शब्द वापरून मिटींगा चालू होतात.
आणि मग तुमची शर्यत चालू होते ती सेल्स रेव्हेन्यू शी. ग्लास सिलिंग चे काही थ्रेशोल्ड पॉईंट्स आहेत. साधारण १ कोटी, ३ कोटी, १० कोटी, ३० कोटी, १०० कोटी, २०० कोटी, ५०० कोटी......... याच्या पुढे विचार करण्याची सध्या तरी माझी ताकद नाही.
एक काही तरी लिमिट असावी आणि इथलं ग्लास सिलींग फुटलं की बर्याचदा एस्केप व्हेलॉसिटी लागू होते. चाकाला इनर्शिया मिळतो. त्यातून धीरूभाईंचं नाव होतं, नारायणमूर्ती जगाला माहिती होतात, टाटा नाव दीडशे वर्षानंतर झळकत राहतं. आपोआप गति मिळत राहते. मग चक्र चालू राहते, अव्याहत.
आता ग्लास सिलींग ला धडकून थांबण्याची कारणं, उद्याला.
क्रमश:

No comments:
Post a Comment