प्रविण, तुझ्या गोष्टीवरून मपली पण आठवली रे दहावीची गोष्ट.
मी म्हणजे शाळेत अगदी ओढून ताणून हुशार वैगेरे गणला गेलेलो. म्हणजे खरंतर गंडला गेलेलो. म्हणजे मी हुशार नव्हतो पण मास्तर लोकं, मित्र आणि इतकंच काय माझे आई वडील ही मला हुशार वैगेरे समजू लागले होते. शाळेत लागलेली ही हुशारीचा अभिनय करण्याची सवय पुढे मला आयुष्यभर उपयोगी पडली. आज मी जो काही आहे त्यामागे ह्या अभिनयकलेचा सिंहाचा वाटा आहे यात तिळमात्र शंका माझ्या मनात नाही. (आमच्याही नाही, असं कुणीतरी पुटपुटल्याचं ऐकू येतंय मला)
दहावीची परीक्षा. पहिलाच पेपर मराठीचा. मी गेलो पार तेजतर्रार होऊन. हातावर दही वैगेरे टाकलं माऊलीने. शर्ट इन बिन करून पोहोचलो केंद्रावर.
सगळ्यांच्याकडे तेव्हा ते ब्राऊन कलरचं पॅड असायचं, चिमटेवालं. माझ्या काकांनी फोल्ड होणारं पॅड दिलं होतं. म्हणजे वरती चिमटा अन आत पेन वैगेरे तसंच पेपर ठेवायला कप्पे. तशीही शायनिंग टाकण्याचा एकही चान्स सोडत नव्हतो मी. अजूनही सोडत नाही.
तर ते पॅड घेऊन रूबाबात बसलो जाऊन टेबलवर. धडधड वाढली होती. पेपर आला मराठीचा. तसा ठीकंच होता. खरडायला चालू केलं.
अन आला तो स्क्वाड. प्रत्येकाची चेकिंग चालू केली. माझ्यापर्यंत पोहोचले. ते पॅड हातात घेतलं त्यांनी. उलटंपालटं करत ते कुतुहलाने पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य ते वेगळंच पॅड पाहून अन माझ्या डोळ्यात अभिमान, म्हणजे तीच शायनिंग.
चेक करणार्याने पॅड च्या मधे हात घातला. तिथे एक कप्पा होता. अन त्यातून त्याने एक काहीतरी लिहीलेला कागद बाहेर काढला. अन कागद वाचत माझ्याकडं बघू लागला. इतका वेळ विजयी विश्व वैगेरे भाव असलेला माझा चेहरा खर्रकन उतरला. रडकुंडीने मी त्या माणसाकडे बघू लागलो. त्याने परत पॅड चेक केलं. अजून काही ऐवज सापडला नाही. एव्हाना वर्गात इज्जतीचा फालूदा व्हायला चालू झाला होता. पोरं पोरी डोळे विस्फारून बघत होते.
त्या चेकरने खिसे वैगेरे तपासले. सुदैवाने काही सापडलं नाही. मला म्हणाला "पेपर लिहीणं चालू ठेव, घाबरू नकोस. मी येतो ५ मिनीटात" अन गेला. ती ५ मिनीटं मला युगासारखी वाटली. गर्भगळित होणं वैगेरे काय असतं ते पहिल्यांदा अनुभवलं.
तो आला अन म्हणाला "लिही पेपर, काही प्रॉब्लेम नाही" डोळे पूसत पेपर कसाबसा लिहीला. तीन तास पुरे झाल्यावर ऑफीसमधे कुणी सर घेऊन गेले अन दाखवला तो सापडलेला कागद. बाबा पण उभे होते. इंग्रजी विषयाच्या नोटस होत्या त्या. म्हणून वाचलो. अभ्यास करताना तो कागद चूकुन पॅड मधे राहिला होता.
अगदीच काही नाहीतर मराठीला मार्क कमी का पडले याचं उत्तर द्यायला मी या घटनेचा पुरेपूर वापर करून घेतला.
तो जर मराठीचा कागद निघाला असता तर.........अजूनही ते आठवलं की मी थरकापतो.
त्या दिवसापासून मी फोल्ड होणारं पॅड वापरून सोडून दिलं, आता पोरांनाही नाही वापरू देत. इतकंच काय, पण राजेश मंडलिक, व्यवस्थापकीय संचालक, कुठलेही फोल्ड होणारे पॅड, डायरी बियरी वापरत नाहीत.

No comments:
Post a Comment