चेन्नैत एक गेस्ट हाऊस रेंट आऊट केलं आहे. खरंतर भाड्याने घेतलं आहे असं
म्हंटलं असतं तरी काही चुक नाही. पण भाड्या हा आत्मनिंदेंचा इतका कडक
अविष्कार लिहायला कसं तरीच वाटलं. (अन गेस्ट हाऊस, हा हा. च्यामायला २५०
स्क्वेअर फूटची खोली आहे. दोन पेक्षा जास्त लोकं राहिले तर एकमेकांना अंग
घासेल इतकी लहान. लाल करा हो, पण किती?) असो.
पण आहे मात्र अगदी भारी वस्तीत. हो म्हणजे उच्चभ्रू की काय म्हणतात ना तशी. स्वच्छ बिल्डींग. भला मोठा टेरेस आहे बाजूलाच. एका किमीवर मरीना बीच आहे. ज्या गल्लीत आहे तिथे येतानाच मी एक भलं मोठं घर बघितलं, त्याला पुरूषभर उंचीची कंपाऊंड वॉल, बाहेर पोलीसच्या गाड्या. अन अशी समोरासमोर दोन घरं. अन तिथून चार पाच प्लॉट सोडले की आमची बिल्डींग. त्याच संध्याकाळी टेरेसवर भरार वारा खाता खाता मी प्रदीपला विचारलं "Who lives in those big houses?" तर तो म्हणाला "Subramaniam Swamy?" मी चपापलो.
(आता पुढचं संभाषण मराठीत) मी विचारलं "हा वारा आपल्या बिल्डींगकडून स्वामी साहेबांच्या घराकडे जातो की त्यांच्या घराकडून आपल्या घराकडे" तर तो म्हणाला "I don't know. But why are you asking this" मी काही बोललो नाही. आणि काय सांगायचं. हेच ना "आधीच आम्ही येडपट, त्यात शेजारी स्वामी साहेब रहायला" मग वार्याची दिशा नको बघायला?
(हे "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" ह्या जुन्या प्रचलित किंवा "आधीच तर्कट, त्यात पद्य प्याला" या गजू तायडेंच्या नव प्रसारित म्हणीच्या चालीवर वाचावे)
"आधीच आम्ही येडपट, त्यात शेजारी स्वामी साहेब रहायला" सॉलीड pun. म्हणजे ज्यांना मी येडपट वाटतो तेही खुश अन ज्यांना स्वामी साहेब हुशार वाटत नाहीत तेही खुश. (इतकी आत्मवंचना बरी वाटते.) असो.
अजून एक सांगायचं म्हणजे, तथाकथित उच्चभ्रू वस्तीतल्या कुंड्याही कचर्याने दिवसरात्र ओसंडून वाहत असतात. अगदी स्वच्छ इंडिया कल्पनेच्या उद्गात्यांचे ऑफीशियल भाट त्या गल्लीत राहत असतील तरीही.

No comments:
Post a Comment