दुसरं असं की हर्षदने अशा चुका कबूल केल्या आहेत की ज्या गोष्टी केल्या तर त्याचा उदो उदो करण्याची फॅशन आजकाल रुजत चालली आहे. उदा: अभ्यासाचं महत्व. किंवा नोकरीत काही राम नाही, बिझिनेस करा.
अपवाद म्हणून अशी लोकं यशस्वी होतात आणि म्हणून त्यांच्या कहाण्या बनतात. पण एखाद्याची कहाणी बनते म्हणून तोच यशस्वी होण्याचा महामार्ग आहे असा एक गैरसमज समाजात पसरत चालला आहे आणि हर्षदने त्याचा योग्य समाचार घेतला आहे. अर्थात त्याने हे प्रत्यक्ष लिहायचं टाळलं आहे पण त्याच्या लिखाणातून ते अधोरेखित नक्कीच होतं.
पुण्यातील एक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. ते त्यांच्या व्याख्यानात नेहमी सांगतात की जो कर्ज न घेता व्यवसाय करतो त्याला बिझिनेस कळत नाही. माझ्या मते अतिशय चुकीचा संदेश ते देत आहेत. हर्षदचं पण तेच मत आहे. कर्ज केव्हा, का आणि किती घ्यावं याची शास्त्रीय पद्धत आहे. ती जर फॉलो केली तर नंतर प्रश्न कमी उभे राहतील. अगदी थोडक्यात सांगायचं तर तुम्ही सगळे इन्कम सोर्स बँकेला सांगा अन बँक जितकं लोन द्यायला तुम्हाला लायक समजते तेवढीच तुमची कपॅसिटी असते. हर्षदच्या लेखातून असे काही धडे कळतात.
सगळ्यात मुख्य म्हणजे लोकांना खूप घाई झाली आहे मोठं होण्याची. इमानेइतबारे काम केलं तर यश या जन्मात तुमच्या हातात येणार आहे. असं असताना या घाईपायी आपण ते आवाक्यात आलेलं यश आपल्याच लाथेने पुढे ढकलतो. हर्षादने हे असं प्रत्यक्ष लिहिलं नसलं तरी हा संदेश त्याच्या अनुभवातून लपलेला आहे.
No comments:
Post a Comment