Friday 19 May 2017

ज्योतिषी

आज करू, उद्या करू असं करत मी काही गोष्टी पुढे ढकलत असतो. उदा: ज्योतिषाकडे जाणं.

मला कधी कधी आयुष्यात बेकार प्रॉब्लेम्स आले आहेत. आणि त्या गर्तेत मी महिनोंमहिने घालवायचो. प्रोब्लेम्सची तीव्रता अशी असायची की वाटायचं एखाद्या ज्योतिषाला हात दाखवावा. विचारावं, दादा कधी संपेल हा प्रश्न?

पण मग तो प्रश्न सोडवायच्या नादात मी ज्योतिषाकडे जायचं विसरायचो. दिवसभर सोल्युशन शोधण्यात वेळ घालवल्यावर रात्री थकून झोपताना आठवायचं, अरे आपण आज परत विसरलो ज्योतिष दादाकडे जायला.

काम करता करता एखादे दिवशी असं लक्षात यायचं की आपण तर प्रॉब्लेम मधून बाहेर पडलो आहे. मग मला खूप वाईट वाटायचं की आपण परत ज्योतिषाकडे जायला विसरलो ते. हे असं आयुष्यात खूप वेळा झालंय.

काय माहित या आयुष्यात मला ज्योतिषाकडे जायला मिळतं की नाही ते!

No comments:

Post a Comment