Friday 19 May 2017

कस्टम्स

तर एकुणात आजकाल इंडस्ट्री, स्टार्ट अप यांच्याबद्दल खूप बोलबाला चालू आहे. इंडस्ट्रीच्या लोकांना रेड टेपिझम मधून मुक्तता मिळून रेड कार्पेट ट्रीटमेंट मिळते आहे असा एकुणात सूर आहे.

मला स्वतः ला असं काही वाटत नाही आहे. जिथे पैसे लागतात तिथे आजही लागतात. जिथे वेळ लागायचा तिथे आजही वेळ लागतोच.

आमची एक शिपमेंट चायना तुन आली. त्या कंपनीचं हेड ऑफिस यु के त आहे. त्या शिपमेंट चं इन्व्हॉईस यूकेतून बनलं. पेमेंट देताना बँकेने सांगितलं, हे चालणार नाही. शिपमेंट जिथून आली तिथूनच इन्व्हॉईस व्हायला पाहिजे. बरं मग पेमेंट करताच येणार नाही का? तसंही नाही. काही कागदी घोडे नाचवले. महिनाभर टाइम पास केला, अन पेमेंट दिलं.

इंडियन कस्टम्स. आमची कंपनी सेटको झाली. त्यामुळे आम्ही जगभरातल्या सेटको साठी सिस्टर कंपनी झालो. सेटको च्या दुसऱ्या देशातल्या प्लांट मधून इंपोर्ट होणाऱ्या गोष्टी क्लीअर करायला ही मंडळी आम्हाला जी नाचवत आहेत, त्याने झीट पडायला आली आहे. सहा महिने झालेत, कस्टम्स मध्ये मटेरियल पडून आहे. कस्टमर ठणाणा मारतोय आमच्या नावाने. पण ही लोकं, त्यांना ना खेद ना खंत. ढिम्म हलत नाहीत. ५% ड्युटी झाली आहे, त्यात आता आम्ही काय चोरणार? तरी भिकारी बनवून ठेवलं आहे आम्हाला.

हसतात हो, हे बाहेरची लोकं आपल्याला. आपल्या बाबा आदम च्या पद्धतीला, आपल्या अजागळ पणाला. कुठल्या तोंडाने आपण उत्पादकता वाढवायच्या गोष्टी करतोय. प्रोडक्टिव्ह वेळ या फालतु गोष्टी निस्तरण्यात जातोय.

जादूची कांडी फिरवता नाही येणार हे कळतंय, पण तरीही जे घडतंय त्यापेक्षा दवंडी जोरात पिटली जात आहे, हे जाणवतंय.

No comments:

Post a Comment