Friday, 19 May 2017

प्रतिष्ठा

काल सिंहगड रोडला नांदेड फाट्यावर ट्रॅफिक जाम झाला होता. मी माझ्या बाजूने व्यवस्थित कार हळूहळू पुढे चालवत होतो. अचानक समोर टिव्हीएस ऍक्सेसवाला गृहस्थ आला. पाठीमागे त्याची १३-१४ वर्षाची मुलगी बसली होती.

ऍक्सेस मुळे माझा रस्ता ब्लॉक झाला होता. त्याची पूर्ण चूक होती. मी त्या दुचाकीस्वाराचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होतो, अर्थात चिडून. पण तो सज्जन माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करत पुढे गाडी दामटत होता. मी कारमध्येच चडफड करत होतो. 

एव्हाना त्या गृहस्थाची ती मागे बसलेली लेक माझ्या डोळ्यासमोर आली. तर तिने पहिल्यांदा नजरेने आणि नंतर हळूच हात जोडून सॉरी म्हंटलं. मी पण हलकेच स्माईल दिलं.

मनात आलं पोरगी आईवर गेली असणार.

गमतीचा भाग सोडा. पोरगी समजूतदार आहे म्हणून गोष्ट वेगळी. आदरवाईज उद्याची पिढी घडवण्यासाठी आईबाप असले आदर्श ठेवत असतील तर अवघड आहे.

प्रतिष्ठा जपण्याच्या नादात आपण चारित्र्य गमावून बसतो.

No comments:

Post a Comment