व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेल्या मित्रा मैत्रिणींनो
सगळ्यात प्रथम "जुळल्या सगळ्या आठवणी, स्वर आले दुरुनी' या पुस्तकाबद्दल लेखिका प्रिया प्रभुदेसाई आणि प्रकाशक हर्षद आणि ऋचा बर्वे यांचे हार्दिक अभिनंदन.
मी जेव्हा पहिल्यांदा प्रियाचं लिखाण वाचलं, त्या नंतर काही दिवसातच तिला फेस बुकर प्राईज विजेती म्हणून डिक्लेयर केलं होतं. आता पुढची स्टेप इनबॉक्स. झालं का जेवण. असं तिला वाटलं असावं. कारण ती सुरुवातीला माझ्या कॉमेंटवर फार काही घास टाकायची नाही. दबकूनच असायची जरा. पण मी मात्र तिचं वाचत माझ्या मतावर ठाम होत गेलो आणि तिच्या स्नेह सुलभ स्वभावामुळे विविध विषयांवर आम्ही बोलू लागलो.
त्या ठाम होण्यामागे काही स्पेसिफिक कारणं आहेत. पहिले आपण तिच्या समाजकारणाच्या पोस्टबद्दल बोलू. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे विषयाची तर्कसुसंगत मुद्देसूद मांडणी. ती विषयाची मांडणी इतकी अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक करते की त्यावर आपल्याला प्रतिवाद करायचा असेल तरी जरा दबकत आणि परत विचार करून लिहावा लागतो. सोशल मीडिया वर विचार करून लिहावं लागायचं महाकठीण काम तिच्या पोस्टवर करावं लागतं. म्हणजे उचललं बोट आणि दाबलं की बोर्डवर असं तिथं होत नाही. म्हणजे करू शकत नाही. सोशल मीडियावर असं विचारांना उद्युक्त करणारं लिखाण खूप कमी जणांचं आहे त्यात प्रियाचं स्थान वरती आहे.
समाजकारण झालं, आता तिच्या राजकारणाच्या पोस्ट बद्दल बोलू. पोटात खड्डे पडले ना! माझ्याही घशात अडकल्यासारखं झालंय. घाबरू नकोस प्रिया, मी यावर काहीच बोलणार नाही आहे. आणि मी तुला काय घाबरू नकोस म्हणून सांगू,मीच सटपटलो आहे.
हीच प्रिया जेव्हा ललित आणि त्यातल्या त्यात मानवी नातेसंबंध या विषयावर लिहिते तेव्हा निग्रही प्रिया अम्मा, तिचे सासरे, वडील यांच्याबद्दल तरल लिहिताना भावुक होते, तर अलका गांधी असेंरकर यांच्या कवितेचा विस्तार करताना पुरुषांच्या व्यक्तिमत्वावर खट्याळ पणे व्यक्त होते, आणि सोशल मीडियाच्या अनुषंगाने तिला काही कहाण्या कळतात तिच्यावरचे भाष्य, इमरोज, अमृता प्रीतम आणि साहिर या त्रिकोणावरचे तिचे विश्लेषण, तिचे नुकतेच आलेले ती सध्या काय करते ही सिरीज, असे विविध विषय ती अगदी लीलया हाताळते. त्या लिहिण्यात एक प्रवाह असतो. हे लिहिताना जेव्हा ती वाक्य संपलं की चार पाच डॉट्स टाकते. ते कशाला टाकते हे माहीत नाही, पण त्यामुळे आपणही थबकतो आणि त्या प्रवाहात हलकी डुबकी घेतो आणि उत्सुकतेने पुढचं वाचायला सज्ज होतो. फेसबुकची वॉल ही संज्ञा जेव्हा म्हणून वापरतो तेव्हा ज्या वॉल वर मनसोक्त बागडता येतं अशी प्रियाची वॉल आहे.
आता तेंडुलकर बद्दल बोलायचं म्हणजे स्ट्रेट ड्राइव्ह बद्दल बोलणं क्रमप्राप्त आहे. आपण सामान्य माणसं साधारणपणे गाणं म्हंटलं की संगीताशी कनेक्ट होतो. प्रिया संगीताबरोबर शब्दांशी कनेक्ट होते. तिचा गाण्याचा अभ्यास तगडा आहे आणि त्या बरोबर तिची आकलन शक्ती अफाट आहे. ती गाण्याच्या ओळीतील शब्दांचा अर्थ तर सांगतेच पण त्या ओळींमध्ये दडलेला अर्थ जेव्हा उलगडून सांगते तेव्हा बहार येते. बरं हे विश्लेषण म्हणजे गाण्याची चिरफाड नसते तर अत्यंत नजकातदार अन सर्जनशील निरूपण असतं ते गाण्याचं. मला खात्री आहे, प्रियाने गाण्याचं रीतसर शिक्षण घेतलं असावं. त्याशिवाय त्या गाण्याच्या तांत्रिक बाजू ती सांगू शकणार नाही. आणि वर तिची मराठी शब्दांवर हुकूमत आहे अन भाषेवर प्रेम. मग एकदा अशा तंत्रिकतेला सुयोग्य शब्दांचं कोंदण लाभलं की जे उतरतं ते अफलातून असतं. म्हणजे तिचे या विषयावरचे काही लेख असे असतात की संपूच नये. तिने लिहीत राहावं आणि आपण वाचत जावं. मान दुखते पण मन थकत नाही. साधारणपणे सोशल मीडियावर वाचताना स्क्रीनच्या साइज प्रमाणे लेखाची रुंदी कळते आणि स्क्रोल करत गेलं की लांबी कळते. शब्दांची खोली ज्या मूठभर लोकांची कळते त्यात प्रिया आहेच हे निर्विवाद. पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा ही काळी अक्षरं उमटत जाताना ह्या दोन रंगामध्ये ज्या इंद्रधनुषी रंगांची अशी उधळण होते की आपण स्तिमित व्हावं.
हे पुस्तक आणलंय हर्षद बर्वेनी. त्याचं हाऊ टू फेल इन लाईफ आणि हाऊ आय किल्ड बिझिनेस ही दोन आगळ्या नावाची आणि वेगळ्या कंटेंटची पुस्तकं आली आहेत. त्याची पाच अजून वेगळ्या विषयाची पुस्तकं पण आली आहेत. त्याशिवाय माझ्या माहितीत चार दुसऱ्या मित्रांची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. ज्या वेगाने तो पुस्तकं आणतो आहे, त्यानुसार त्याने आज पासून पाचवं पुस्तक रिव्हर्सिंग फेल्युअर्स नावाचं असावं अशी माझी आंतरिक इच्छा आहे. त्यासाठी त्याला हार्दिक शुभेच्छा.
इतकं बोलल्यावर प्रिया माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आली नाही यावरचा राग माझा शांत झाला आहे असा तिचा गैरसमज झाला असेल. पण तो राग एखादी शिक्षा दिल्याशिवाय शांत होणार नाही. तर तिच्या दहाव्या पुस्तकाच्या प्रकाशनाला सुद्धा मी अशीच १२-१३ मिनिटं खाणार हीच तुला आणि हर्षद ला शिक्षा.
आता थांबतो. हर्षद ने आज्ञा देतानाच मला सांगितलं होतं की भाषण देताना फेसबुकच्या पोस्टसारखी लांबण लावू नका. त्याने हे त्याच्या पोस्ट बद्दल म्हंटलं असेल हे समजून मी हसलो होतो. कारमध्ये बसल्यावर जाणवलं की तो हे कदाचित माझ्याच बद्दल ही म्हंटला असेल. त्यामुळे बरोबर आठ मिनिटात भाषण संपवतो आहे.
पुन्हा एकदा प्रिया, हर्षद आणि ऋचा चे हार्दिक अभिनंदन.

No comments:
Post a Comment