परदेशात चाललो आहे याची कुठल्याही टाईपची दवंडी फेसबुकवर पिटणार नाही हे बायकोला दिलेलं आश्वासन एक आठवडा कसोशीने पाळलं पण एका आठवड्यानंतर तेजलला भेटलो आणि मग त्या घोषणेला हरताळ फासला.
तेजल कृष्णकुमार राऊत. एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर कनेक्ट होण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यात ती व्यक्ती वयाने लहान असेल तर नक्कीच. पण तेजलच्या घरात पाय ठेवल्यावर मला मोजून पंधरा सेकंद लागले आणि जणू तेजल व एमिल यांच्या लग्नात मी तेजलच्या मागे तिचा मामा वगैरे म्हणून उभा होतो की काय इतक्या आत्मीयतेने मी दोघांशी बोलू लागलो. त्यांच्या दोघांच्या लव्ह स्टोरी पासून सुरू झालेल्या गप्पा ह्या सव्वापाच ला टॅक्सी ड्रायव्हर ने तो आल्याचा सिग्नल दिल्यावर थांबला. तेजल नॉन स्टॉप सेन्सफुल बोलते आणि एमिल खूप मोठे पॉज घेत सेन्सफुल बोलतो. फेसबुकच्या शिरस्त्याप्रमाणे इथे फक्त तेजल असते आणि एमिल त्यावेळेस निद्राधीन झाला असतो. अफलातून बिर्याणी बनवली होती, आणि ती एमिलने बनवली होती असं कुठंही बोलायचं नाही हा माझा आणि तेजलचा करार आहे. लिहायचं नाही असा करार नव्हता. तीन तास तीन मिनिटात संपले.
शनिवारी फ्रँकफूर्ट ला आलो. वैभवीचा भाऊ अमोल गेले सात वर्षे जर्मनीत राहतो. सुरुवातीला पुण्यात अडखळत चालू झालेली अमोलची कारकीर्द इथे जर्मनीत फुललेली पाहून मस्त वाटले. अमोल आणि प्रीतीने अत्यंत नेटका संसार उभा केला आहे. प्रोफेशनल यशाबरोबर मराठी लोकांशी अमोलने केलेलं नेटवर्किंग अफलातून आहे. आणि त्यातून त्याने मग छोटीशी मैफल बनवली. हरफनमौला अजित रानडे, माझा नातेवाईक आणि सध्या जर्मनीत प्रोजेक्ट वर असणारा महेश देवळे, वैभवीचा सख्खा मित्र आणि एका मल्टी नॅशनल कंपनीचा उच्च पदाधिकारी पण त्याची हलकीशी सुद्धा भनक न लागू देणारा डॉक्टर हृषीकेश कुलकर्णी आणि त्याची तितकीच सुविद्य पत्नी प्रज्ञा, ज्याच्या वडिलांशी माझी जितकी वर्षे मैत्री त्याचं साधारण तितकं वय असलेला ओंकार पुरोहित आणि त्याची बायको, नागपूर-कोल्हापूर या दोन टोकाच्या शहरांना जोडणारे अमित आणि शिल्पा हे कपल आणि एकदम शांत पण बोलण्यात खोली असणारा यंग टर्क इंद्रजित या सगळ्यांशी त्याने आवर्जून संवाद साधून दिला. अनेकविध विषयावर बोललो. आणि यात भरीसभर वैभवीचे आई वडील पण तिथेच होते. पुण्यात मी हाताला लागत नाही म्हणून इथे "हा काय बिझिनेस करतो बुवा" हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
पाहिले सहा दिवस तंगडतोड काम आणि नंतर तीन दिवस मूहतोड काम, म्हणजे गप्पा असे अजब जर्मनीतले दहा दिवस घालवले.
(रविवारी पारले जी चे दोन बिस्कीट चहात बुडवून खाल्ले. म्हणजे त्यादिवशी पुण्यात आलो आहे)
जर्मनी डायरी

No comments:
Post a Comment