तर आज एकाला भेटलो. मार्टिन नाव त्याचं. एकदम चकाचक कंपनी आहे त्याची, जर्मनीतल्या एका खेड्यात. जर्मनी बाहेर एक्स्पान्शन करायची खूप इच्छा आहे त्याची. तीन वर्षांपूर्वी भारतात आला होता. नॉर्थ मध्ये अशोक नावाच्या एका उद्योजकाबरोबर तीन महिने राहिला होता. म्हणाला "तुमच्याइथली गरिबी पाहून मी थक्क झालो. आणि ज्या पद्धतीने अशोक त्यांच्या लोकांना कमी पगारात देत होता आणि काम करवून घेत होता, ते पाहून मी त्याला विचारलं की इतक्या कमी पैशात लोकांचं भागतं का? तू जास्त पगार का देत नाहीस". तर तो अशोक नावाचा प्राणी म्हणाला म्हणे "त्यांचं नशीब त्यांना इतके तरी पैसे मी देतोय, नाहीतर यांना हाकलून अजून कमी पगाराची लोकं मी इथे ठेवू शकतो".
त्या अशोकवर भयानक चीड आली होती. अशोकसारखे मूठभर भांडवलदार हे गरीबांची शोषण करत राहतात अन देशाची प्रतिमा जगात बिघडवण्याचं काम करतात. कितीही भांडवलशाहीचा डंका पिटवला तरी मनाने सॊशालिस्ट असणं ही काळाची गरज आहे. उत्पादित होणाऱ्या संपत्तीचं असं वितरण झालं नाही तर गरीब वर्ग हा गरीबच राहणार आणि श्रीमंत हे अजून श्रीमंत होत राहणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि जर एका मोठ्या वर्गाकडे जर भौतिक संपत्ती आली नाही तर देश विकसित होणार हे दिवास्वप्न राहणार.
मार्टिन म्हणाला "तो सगळा प्रकार बघून मला भारताची अक्षरशः किळस आली. एक माणूस दुसऱ्या माणसाला असं वागवू शकतो यावरून मी निर्णय घेतला की भारतात धंदा करण्यासाठी परत पाय ठेवणार नाही. अशोक ने माझा सॉलिड पाहुणचार केला पण त्याचं शॉपफ्लोअर एकदम घाणेरडं होतं"
अशोक मुळे तयार झालेली भारताची प्रतिमा मार्टिनच्या मन:पटलावरून काढून टाकायला मला तब्बल एक तास लागला. आणि शेवटी यशस्वी झालो. "पुढील एका वर्षात तुझ्या कंपनीबरोबर मी प्रोजेक्ट करणार" असं त्याने मला आवर्जून सांगितलं.
तो प्रोजेक्ट होईल ना होईल हे काळच सांगेल कारण त्याला वेगवेगळे कंगोरे आहेत. कदाचित माझ्याऐवजी कुणा दुसर्याबरोबर त्याचा प्रोजेक्ट होईल. पण भारतातील लोकांबरोबर उद्योग करण्याची त्यांची लायकी नाही ही प्रतिमा पुसून टाकण्यात बऱ्याच अंशी यश मिळालं....
.......हे ठीकच झालं.

No comments:
Post a Comment